Vivo Y18e आपल्या वाय सीरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. याचे नाव Vivo Y18e आहे, हा हँडसेट कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, फोन बजेट ते मिडरेंज मध्ये आला असेल. यात एचडी प्लस रेजॉलूशन असलेला डिस्प्ले आहे. फोनची बॉडी पॉलिकार्बोनेट वापरून बनवण्यात आली आहे. यात १३ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. मीडियाटेकचा हीलियो प्रोसेसर या फोनमध्ये देण्यात आला आहे.पाहुया या मोबाइल Vivo Y18e चे पूर्ण स्पेसिफिकेशन आणि फीचर पुढीलप्रमाणे
Vivo Y18e Display
स्मार्टफोन 1612 × 720 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.56 इंचाच्या एचडी स्क्रीनला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90 Hz रिफ्रेश रेटवर चालते.
Vivo Y18e Colour :
Vivo Y18e इंडियाच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. कंपनीनं फोनची किंमत 7999 पासून सुरुवात केली आहे. या मोबाइल मध्ये दोन वरिएन्त पण असतील. हा फ़ोन Vivo Y18e डिव्हाइस जेम ग्रीन आणि स्पेस ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येईल.
Vivo Y18e Storage :
4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. यात 4 जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजी पण आहे जी फिजिकल रॅमसह मिळून फोनला 8 जीबी रॅमची ताकद प्रदान करतो. हा डिव्हाईस LPDDR4X RAM + eMMC 5.1 ROM टेक्नॉलॉजीवर चालतो. तसेच यात 1 टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड लावला जाऊ शकतो.
Vivo Y18e Camera :
फोटोग्राफीसाठी विवो वाय 18 ई ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सल मेन सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/3.0 अपर्चर असणारा 0.08 मेगापिक्सल सेकंडरी लेन्ससह मिळून चालतो. तसेच Vivo Y18e मध्ये 5 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चरवर चालतो.
Vivo Y18e Battery :
पावर बॅकअपसाठी लो बजेट स्मार्टफोन Vivo Y18e मध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी या मोबाईलला 15 W फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे.
Vivo Y18e price
Vivo Y18e स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅमसह 64 GB इंटरनल स्टोरेज दिले जाईल तसेच या मोबाइल ची Vivo Y18e किंमत 7,999 रुपये असेल.