किसान क्रेडिट कार्ड योजना 2024 – Kisan Credit Card शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखापर्यंत कर्ज असा करा अर्ज 

Kisan Credit Card Benefits, Eligibility How to Apply

नमस्कार मित्रांनो आज आपण किसान क्रेडिट कार्ड योजना 2024 (kisan credit card yojana 2024) या योजने विषयी संपुर्ण माहिती पाहणार आहोत.तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यायचा असेल हा संपुर्ण लेख तुमच्यासाठी महत्वपुर्ण असणार आहे.चला तर मग मित्रांनो पाहूया काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे? किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे काय आहेत? kisan credit card benefits ,लाभार्थी पात्रता,किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे,kisan credit card scheme documents required निकष,किसान योजना कार्ड योजना 2023 साठी अर्ज कसा करायचा? kisan credit card online apply maharashtra याबद्दलची संपुर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे काय? (What is Kisan Credit Card?)

भारत देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता आत्मनिर्भर भारत पॅकेज ची घोषणा करताना केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी किसान क्रेडिट कार्डचा उल्लेख केला आणि शेतकरी वर्गात सगळीकडे KCC ची चर्चा सुरु झाली. शेतकऱ्यांना शेतीची उपकरणे व औजारे खरेदी करण्याकरितां देशातील ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना बँकांकडून जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते.कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना कधी कधी त्या कर्जाचे हफ्ते देखील भरणे अवघड होत असते.

भारतातील शेतकऱ्यांना अशा परिस्थितिमध्ये आपल्या गरजा भागवण्यासाठी किंवा औजारे खरेदी करण्यासाठी कर्ज घेणे सुलभ व्हावे यासाठी भारत सरकारने किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना सुरु केली आहे.जर शेतकऱ्यांकडे हे किसान क्रेडिट कार्ड असेल तर शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजदराने कर्ज मिळते.या सुविधेचा फायदा पशुपालन आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळतो.त्यांनाही या कर्ज योजनेच्या माध्यमातुन ४ टक्के इतक्या अल्प दराने कर्ज दिले जाते.

किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना उद्दीष्ट? (Kisan Credit Card Loan Scheme Objective?)

किसान क्रेडिट कार्ड हि योजना केंद्र सरकार राबवत आहे, पीएम किसान सन्मान निधी योजना यशस्वी झाल्यानंतर ही योजना हाती घेण्यात आली आहे.
या योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ पाहता १ लाखापासून ते ३ लाखापर्यंत मर्यादेचे किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले जाते.
या योजनेमधून देशातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी लागणारे यंत्र औजारे,चांगले उत्पादन काढण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातुन मिळावे हा या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.
या योजनेमधून शेतकऱ्यांनी आर्थिक सहाय्य मिळवून आपल्या शेतीमधून चांगले उत्पादन काढून भारत देशाची ओळख ही आत्मनिर्भर भारत अशी होईल.


किसान क्रेडिट कार्ड योजना लाभार्थी पात्रता?(Kisan Credit Card Beneficiary Eligibility?)

पीएम किसान निधी योजना (Pm kisan sanman Nidhi Yojana) ची लाभार्थी यादी मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्या शेतकऱ्यांना या कार्डचा लाभ मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनाचे पैसे मिळतात अशाच शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्डाचा लाभ दिला जातो.
जर एखाद्या शेतकऱ्यांकडे आपली स्वत:च्या मालकिची जमिन असेल आणि त्या शेतकऱ्याला जर पीएम किसान निधीचे पैसे मिळत नसतील तर अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जातो.
या योजनेचा लाभ हा पशुपालन आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळतो.त्यांनाही या कर्ज योजनेच्या माध्यमातुन ४ टक्के इतक्या अल्प दराने कर्ज दिले जाते.


किसान क्रेडिट कार्ड योजना वैशिष्टय? (Kisan Credit Card Scheme Features)

  • या योजनेमधून विनातारण १ लाख ६० हजारांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • शेतकऱ्यांनी नियमीत कर्ज भरल्यास ३ लाखापर्यंतच्या कर्जावर ४ टक्के व्याज आकारले जाते.
  • शेतकऱ्यांनी नियमीत कर्ज न भरल्यास ३ लाखापर्यंतच्या कर्जावर ७ टक्के व्याज आकारले जाते.
  • ३ लाखापर्यंतच्या किसान क्रेडिट कार्डावर सर्व प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.
  • ज्या बँकेत आपले पीएम किसान योजनाचे पैसे येतात त्या बँकेत फक्त १ पानाचा अर्ज भरुन बँकेत सादर केल्यास योजनेमध्ये सहभागी होता येते.
  • १० ते १५ दिवसात त्वरीत किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.
  • शेतकऱ्यांनी जर १ लाखाच्या आत कर्ज घेतल्यास कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही.
  • विशेष म्हणजे या संपुर्ण प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

किसान क्रेडिट कार्ड योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Required Documents for Kisan Credit Card)

  1. पात्र शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीचा ७/१२ (सातबारा) व ८ अ (आठ अ उतारा)
  2. शेतकऱ्यांने अन्य बँकेमधून कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेतल्याचे शपथपत्र
  3. रहिवाशी प्रमाणपत्र
  4. ओळखपत्र
  5. आधारकार्ड
  6. पॅनकार्ड
  7. २ पासपोर्ट साइज फोटो

किसान क्रेडिट कार्ड योजनासाठी अर्ज कसा करायचा? How to Apply for Kisan Credit Card?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर पीएम किसान सन्मान निधी योजनाच्या अधिकृत वेबसाइटवर (https//www.pmkisan.gov.in ) १ पानाचा फॉर्म दिला आहे त्या फॉर्मची प्रिंट काढून तो योग्य प्रकारे भरुन ज्या बँकेत पीएम किसान चे पैसे येतात त्या बँकेत सादर करावा.
जर ऑनलाइन (kisan credit card online apply) अर्ज करायचा असेल तर जवळच्या CSC म्हणजे आपले सरकार केंद्रावर जाऊन अर्ज करु शकता.‌

किसान क्रेडिट कार्ड उपयोग व कर्ज किती?

KCC Yojana मधून शेतकऱ्यांना किती कर्ज दिले जाते याविषयी अनेक शेतकरी विचारात पहायला मिळतात.या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्याच्या जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे? त्या जमिनीमधून उत्पन्न किती निघते? आणि त्या शेतकऱ्याकडे लागवडी खालिल क्षेत्र किती आहे? या कर्जाची रक्कम ठरवली जाते.

  • केसीसी योजनेमधून शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते.
  • १ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते.
  • १ लाख ६० हजारांपर्यंत विनातारण कर्ज दिले जाते.
  • ३ लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी तारण ताराण ठेवणे गरजेचे असते.

केसीसी योजनेअंतर्गत जे काही कर्ज दिले जाते त्यावर ७ टक्के व्याज दर आकारला जातो.पण शेतकरी जर वर्षभरात कर्जाची परतफेड करणार असेल तर,व्याज दरात ३ टक्के सवलत दिली जाते.म्हणजे एकूण ४ टक्के दराने शेतकऱ्यांना कर्ज मिळते. शेत मालाच्या विक्रीमधून शेतकऱ्यांनी या कर्जाची परतफेड करणे अपेक्षीत असते.किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले,तर त्याला ५० हजार रुपयांचे विमा संरक्षण या योजनेद्वारे दिले जाते.तसेच इतर धोक्यांसाठी २५ हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.

Conclusion
मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 बद्दल संपुर्ण माहिती दिली आहे.जसे की किसान क्रेडिट योजना काय आहे,योजनेचे उद्दिष्ठ,लाभार्थी पात्रता,केसीसी योजनेअंतर्गत किती कर्ज दिले जाते,या योजनेकरिता अर्ज कसा करायचा,लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे,इ. मला आशा आहे की,ही पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही ही पोस्ट इतर मित्रांसोबत नक्की शेअर कराल…धन्यवाद.!

किसान क्रेडिट कार्ड योजना FAQ

१. किसान योजना काय आहे?

किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही भारत सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या आपतकालीन आर्थिक गरजा आणि विशिष्ट क्रेडिट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ऑफर केलेली योजना आहे.

२. किसान क्रेडिट कार्ड योजनेमधून किती कर्ज दिले जाते?

केसीसी योजनेमधून शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते.

१ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते.

१ लाख ६० हजारांपर्यंत विनातारण कर्ज दिले जाते.

३ लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी तारण ताराण ठेवणे गरजेचे असते.

३.मी माझे किसान क्रेडिट कार्ड रोख रक्कम काढण्यासाठी वापरु शकतो का?

होय तुम्ही तुमच्या कार्डच्या क्रेडिट मर्यादेच्या अधिन राहून पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये सुद्धा तुमचे किसान क्रेडिट कार्ड वापरु शकता.

४.किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 मधून घेतलेल्या कर्जाला किती टक्के व्याज दर आकारला जातो?

केसीसी योजनेअंतर्गत जे काही कर्ज दिले जाते त्यावर ७ टक्के व्याज दर आकारला जातो.पण शेतकरी जर वर्षभरात कर्जाची परतफेड करणार असेल तर,व्याज दरात ३ टक्के सवलत दिली जाते.म्हणजे एकूण ४ टक्के दराने शेतकऱ्यांना कर्ज मिळते. शेत मालाच्या विक्रीमधून शेतकऱ्यांनी या कर्जाची परतफेड करणे अपेक्षीत असते.

Ladki Bahini Yojana Online Link Apply Join Now

Leave a Comment