Sanjay gandhi niradhar pension yojana 2024 राज्यातील निराधार नागरिकास म्हणजे ६५ वर्षाखालिल निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले,अपंगातील सर्व प्रवर्ग,क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग, यांना या योजनेअंतर्गत १००० रुपये दर महिन्याला दिले जात होते.या योजने मधून पेंशन मध्ये मागील काळामध्ये राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे.जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल तर त्या साठी पात्रता काय आहे? Sanjay gandhi yojana form कागदपत्रे कोणकोणती लागतात?किती पेंशन मिळणार? Sanjay gandhi niradhar yojana 2023 registration process याबद्दलची संपुर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तरी सर्व माहिती शेवटपर्यत वाचा.
Sanjay gandhi niradhar pension yojana 2024
महाराष्ट्र शासनामार्फत राज्यामधील गरिब व निराधार नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात.त्यांपैकी एक महत्वाची अशी योजना म्हणजे संजय गांधी निराधार पेंशन योजना या योजनेअंतर्गत 65 वर्षाखालिल निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले,अपंगातील सर्व प्रवर्ग,क्षयरोग, कर्करोग,एड्स, कुष्ठरोग,यांना या योजनेअंतर्गत 1000 रुपये दर महिन्याला देऊन शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.2019-20 अगोदर फक्त 600 रुपयांची पेंशन दिली जात होती. परंतू आता राज्य शासनाकडून या पेंशन योजनेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार पेंशन योजना उद्देश
(Sanjay gandhi niradhar pension yojana 2023 purpose )
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राज्यामधील निराधार नागरिकांना शासनाकडून दरमहा 1000 रुपये आर्थिक सहाय्य ददिले जाते, जेणेकरुन त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदीन गरजां भागवण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.अशा व्यक्तिंना मदत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
संजय गांधी निराधार पेंशन योजना लाभार्थी – Sanjay gandhi niradhar pension yojana 2023 Beneficiary )
राज्यातील निराधार व्यक्ती म्हणजे 65 वर्षाखालिल निराधार पुरुष व महिला,18 वर्षाखालील अनाथ मुले,अपंगातील सर्व प्रवर्ग,अंधव्यक्ती, कर्णबधिर,मतिमंद पुरुष व महिला,क्षयरोग,कर्करोग,एड्स, कुष्ठरोग, यां सारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला,निराधार विधवा महिला,आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा महिला,घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतू पोटगी न मिळणाऱ्या महिला,वेश्या व्यवसायामधून मुक्त केलेल्या महिला,तृतीयपंथी,तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, इ.या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
संजय गांधी निराधार पेंशन योजना पात्रता व अटी – Sanjay gandhi niradhar pension yojana 2023 Terms & Condition )
संजय गांधी निराधार पेंशन योजनेच्या आवश्यक अटी व पात्रता खालीलप्रमाणें आहेत.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- लाभार्थी व्यक्तिचे वय 65 वर्षाखालिल असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसावा.
- अर्जदार हा कोणत्याही जमिनीचा मालक नसावा.
- 65 वर्षावरील व्यक्तींना या पेंशन योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे नाव दारिद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादित असणे आवश्यक आहे.
- लाभार्थीचे मुले 21 वर्षाची होईपर्यंत किंवा मुलांना नोकरी मिळेपर्यंत शासकिय,निमशासकिय, खाजगी, यामध्ये जे अगोदर घडेल तोपर्यत लाभार्थी व मुलांना लाभ देण्यात येईल.
- मुलाला नोकरी मिळाल्यानंतर शासकिय,निमशासकिय,खाजगी, कुटूंबाचे व मुलांचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थीची पात्रता ठरविण्यात येईल.
संजय गांधी निराधार पेंशन योजनेअंतर्गत समाविष्ट जाती
खुला वर्ग
अनुसुचीत जाती
अनुसुचित जमाती
विमुक्त जाती
भटक्या जमाती
विशेष मागास प्रवर्ग
इतर मागास वर्ग
निराधारांचा प्रवर्ग
अंध
अस्थिव्यंग
मूकबधिर
कर्णबधिर
मतिमंद
आजार
क्षयरोग
पक्षघात
कर्करोग
एड्स
कुष्ठरोग
इतर दुर्लभ आजार
महिलांचे प्रवर्ग
शेतमजूर महिला
निराधार महिला
घटस्फोट प्रक्रियेतील महिला
घटस्फोट झालेली परंतू पोटगी
न मिळालेली महिला
घटस्फोट झालेली योजनेत विहीत
केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी
पोटगी मिळालेली महिला
अत्याचारीत महिला
वेश्या व्यवसायातून मुक्त
झालेली महिला
अनाथ मुले
मुलगा
मुलगी
संजय गांधी निराधार पेंशन योजनाचे फायदे
( Sanjay Gandi niradhar pension yojana 2024 Benefits )
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी प्रति महिना आता 1000 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.
परंतू 28 जुलै 2023 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये या संजय गांधी निराधार पेंशन योजनेच्या मानधनात 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे या योजनेच्या लाभार्थीना आता एकुण 1500 रु प्रतिमहिना अर्थ सहाय्य दिले जाणार आहे.
एका कुटूंबात या योजनेचे एका पेक्षा जास्त लाभार्थी असल्यास त्यांना प्रतिमहिना 1200 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते.
या योजनेमुळे राज्यामधील नागरिक सशक्त व आत्मनिर्मर बनतील.
राज्यामधील निराधार व्यक्तींना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदीन गरजां भागवण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
संजय गांधी निराधार पेंशन योजना कागदपत्रे
( Sanjay Gandi Niradhar pension Yojana 2023 Documents in Marathi )
ओळखीचा पुरावा
अर्जदाराचे पासपोर्ट फोटो
ओळखीचा पुरावा पारपत्र
पॅनकार्ड
आधारकार्ड
मतदान ओळखपत्र
निमशासकिय ओळखपत्र
आर.एस.बी.वाय. कार्ड
मारोहयो जॉबकार्ड
वाहन चालक परवाना
पत्याचा पुरावा
ग्रामसेवक,तलाठी,मंडळ निरिक्षक,यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखवा किंवा कओणत्याहघ न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखला दाखला ही ग्राह्य धरण्यात येईल.
वयाचा पुरावा
शाळा सोडल्याचा दाखला
शिधा पत्रीकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा ग्रामपंचायतीच्या,नगरपंचायतीच्या,महानगरपालिकेच्या, जन्मनोंद वहिमधिल उताऱ्याची साक्षांकित प्रत
ग्रामिण,नागरी खणालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकिय वैद्यकिय अधिकाऱ्यांने दिलेला वयाचा दाखला
उत्पन्नाचा पुरावा
तहसिलदार किंवा उपविभागिय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्रय रेषेखालील यादिमध्ये त्या व्यक्तिचा कुटूंब समावेश असल्याबाबतचा साक्षांकित पुरावा
रहिवाशी दाखला
ग्रामसेवक / तलाठी / मंडळ निरिक्षक / नायब तहसिलदार / यांनी दिलेला रहिवाशी दाखला किंवा तहसिलदार यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला.
संजय गांधी निराधार पेंशन योजना ऑनलाईन अर्ज पद्धत – Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana 2023 Online Application
संजय गांधी निराधार पेंशन योजनाचा अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाइट वरुन देखील तुम्ही अर्ज करु शकता.किंवा आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन देखील आपण या योजनेचा अर्ज करु शकता.
हे पण वाचा –
संजय गांधी निराधार पेंशन योजना ऑफलाईन अर्ज पद्धत – Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana Oflfine Application Process
संजय गांधी निराधार पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला तो राहत असलेल्या ठिकाणच्या जिल्हा अधिकारी कार्यालय,तहसिलदार, तलाठी कार्यालयात जाऊन संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरुन आवश्यक त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून आपला अर्ज सदर कार्यालयात जमा करावा.
संजय गांधी निराधार पेंशन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा
संजय गांधी निराधार पेंशन योजना 2024 याबद्दलची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे दिली आहे. आशा आहे की तुम्हाला ही सर्व माहिती चांगली समजली असेल. तुम्हाला अशी आणखी महत्त्वाची माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला ती या वेबसाइट वर वाचायला मिळेल. हा संपुर्ण माहिती आपण पाहिल्या नंतर, ती आपल्या मित्रांना,नातेवाईकांना नक्की शेअर करा.