या रेशन कार्ड धारकांना खुषखबर! आता धान्याऐवजी थेट खात्यात मिळणार पैसे
Dbt for keshari ration card राज्यामधील १४ आत्महत्या ग्रस्त जिल्हयांतील केशरी शिधापत्रीका लाभार्थीना, शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातुन रेशन धान्याऐवजी प्रति महा १५० रुपये अर्थात वर्षाला १८०० रुपये येवढी थेट रक्कम या लाभार्थी च्या बँक खात्यामध्ये डिबीटी द्वारे दिली जाणार आहे.याचा योजनेचा शासन निर्णय देखील निर्गमीत करण्यात आला आहे.कशी राबवली जाणार ही योजना?काय आहेत निकष?कसा मिळणार लाभ?याबद्दल ची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तरी संपुर्ण माहिती शेवट पर्यंत पहा.
DBT for Keshari ration card
राज्यामधील १४ आत्महत्या ग्रस्त जिल्हयांतील केशरी शिधापत्रीका लाभार्थीना,शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातुन रेशन धान्या ऐवजी प्रति महा १५० रुपये अर्थात वर्षाला १८०० रुपये येवढी थेट रक्कम या लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये डिबीटी द्वारे दिली जाणार आहे.जानेवारी 2023 पासून प्रति लाभार्थीना प्रति महा १५० रुपये अर्थात प्रति महा वार्षिक १८०० रुपये ची रक्कम केली जाणार आहे.
राज्य शासनामार्फत याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमीत करुन जे शिधापत्रीका धारक आहेत यांना अर्ज करण्याचे आव्हान देखील करण्यात आले होते.रेशन दुकान धारकांकडून याचे अर्ज भरुन स्विकारले जात होते.आणि याकरिताच पहिल्या टप्यांमध्ये जानेवारी ते मार्चपर्यंत जे लाभार्थी पात्र होतील अशा पात्र लाभार्थ्याकरिता काही कोटी रुपये निधीची तरतूद देखील करण्यात आली होती.आणि याच निधीचे पैसे आता लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
कुटूंबात अधिक लाभार्थी असतील तर
राज्यामधील या योजनेचे जे पात्र लाभार्थी झालेले होते त्यांना जानेवारी ते मार्च या तिन महिन्याचे प्रति लाभार्थी १५० रु.या प्रमाणे तीन महिन्याचे प्रति लाभार्थी ४५० रुपये येवढी रक्कम या लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे.एखाद्या कुटूंबाच्या रेशन कार्डावरती कुटूंबातील तीन लाभार्थी असतील आणि तुम्ही कुटुंबप्रमुखाच्या नावाने अर्ज केला असेल तर प्रति लाभार्थी १५० रुपये म्हणजेच प्रति कुटूंब ४५० रु.अशा प्रमाणे ती रक्कम आपल्याला मिळणार आहे.
योजनेत या १४ जिल्हयांचा समावेश (Dbt for keshari ration card These 14 districts are included in the scheme)
राज्यातील या योजनेमध्ये फक्त १४ जिल्यांचा समावेश करण्यात आला होता.राज्यामधील मराठवाडा,विदर्भ, यांमधील औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हे व अमरावती विभागामधील सर्व जिल्हे,आणि नागपुर विभागातील वर्धा जिल्हांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.या १४ जिल्यातील एकुण लाभार्थी ४० लाखांपेक्षा जास्त लाभार्थी यामध्ये पात्र होतील अशी शक्यता होती.
परंतू अनेक लाभार्थीच्या माध्यमातुन अनेक अर्ज सुद्धा भरण्यात आले ले नाहीत.परंतू ज्या लाभार्थीनी आपलथ अर्ज भरले आहेत त्या लाभार्थीची जी काही पात्र झालेली रक्कम आहे,ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये मार्च 2023 पर्यंतची त्यांच्या खात्यामध्ये वितरीत करण्यास सुरुवात झाली आहे.आपण जर या योजनेसाठी पात्र असाल किंवा आपल्याकडे जर केशरी शिधापत्रीका धारक शेतकरी कुटूंबातील लाभार्थी असाल तर आपण सुद्धा हा अर्ज भरु शकता.आणि आपला अर्ज भरल्यानंतर जर आपण पात्र झालात तर आपल्या कुटूंबाला सुद्धा प्रति लाभार्थी प्रतिमहा १५० रुपये येवढी रक्कम आपल्या खात्यामध्ये वितरीत केली जाणार आहे.
योजनेचा अर्ज कुठे भरायचा? ( Dbt for keshari ration card application form )
राज्यामधील १४ जिल्यातील प्रत्येक गावच्या रेशन दुकानदाराकडे विहीत नमुन्याचा अर्ज तुमच्या रेशन दुकानदाराकडे सादर करायचा आहे.नमुन्याचा अर्ज खाली दिला आहे.
Dbt for keshari ration card
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
शिधापत्रीकेच्या पहिल्या व शेवटच्या पानांची छायांकित प्रत
बँक पासबुकच्या पहिल्या (खात्याचा आवश्यक तपशील दर्शविण्यार्या) पानांची प्रत
अशा प्रकारे वरील अर्ज भरुन आपल्या रेशन दुकानदाराकडे सादर करायचा आहे.अर्ज केल्यानंतर आपण जर पात्र झालात तर आपल्या कुटूंबातील प्रति लाभार्थी १५० रुपये अशा प्रकारे या निधीचे वितरण केले जाईल.
Dbt for keshari ration card याबद्दलची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे दिली आहे. आशा आहे की तुम्हाला ही सर्व माहिती चांगली समजली असेल. तुम्हाला अशी आणखी महत्त्वाची माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला ती या वेबसाइट वर वाचायला मिळेल. हा संपुर्ण माहिती आपण पाहिल्या नंतर, ती आपल्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा.
Share this: