Table of Contents
ToggleFree ration card Yojana
राज्य शासनाच्या माध्यमातुन नागरीकांना ई शिधापात्रीका अर्थात Free E – Ration card मोफत पणे उपलब्ध करुन देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे,आणि यांच्याबद्दलचे एक महत्वाचे अपडेट आज या पोस्ट च्या माध्यमातुन पाहणार आहोत.
21 फेब्रूवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये RCMS प्रणालीद्वारे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थीना QR Code आधारीत ई शिधापत्रीका ऑनलाईन पद्धतींने डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ई शिधा पत्रीका डाऊनलोड करण्यासाठी शुल्क आकारण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता.
राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे व शिधा पत्रीकाधारक गरिब व गरजू लोकांसाठी कुटूंबातील असल्यामुळें त्यांच्याकडून हे शुल्क आकारणे हे योग्य नसल्यामुळें राज्य शासनाच्या माध्यमातुन आता या शिधा पत्रीका मोफत पणे उपलब्ध करुन देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.
मोफत मिळणार ई शिधा पत्रीका
आता या शिधा पत्रीका मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी 16 मे 2023 रोजी एक महत्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.या शासन निर्णयाच्या माध्यमातुन सार्वजनीक वितरण सेवे अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या ( अंत्योदय अन्न योजना ) व प्राधान्य कुटुंब योजना याच प्रमाणे राज्य योजनेच्या आत्महत्या ग्रस्त जिल्यातील APL शेतकरी अशा सर्व शिधा पत्रिकांधारकांना ऑनलाईन सेवे द्वारे ई शिधा पत्रीका सुविधा ( निशुल्क ) मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अर्जदार यांनी शिधा पत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपध्दती नुसार तपासणी करुन योजनेच्या प्रकानुसार ऑनलाईन ई शिधा पत्रीका उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्जदारास संबंधित संकेतस्थळावरुन सदर ई शिधा पत्रीका डाऊनलोड करता येणार आहे.अशा प्रकारचा हा एक महत्वपुर्ण शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातुन निर्गमीत करण्यात आला आहे.जो आपण www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता. असा एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमीत करुन राज्यामधील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
शासन निर्णय येथे पहा
👇👇👇
www.maharashtra.gov.in