How to Download 7/12 Utara Online from Umang App? | उमंग ऐपमधून सातबारा कसा डाऊनलोड करायचा

How to Download 7/12 Utara Online from Umang App | उमंग ऐपमधून सातबारा कसा डाऊनलोड करायचा?

नमस्कार मित्रांनो आज आपण Download 7/12 for umang app मधून सातबारा कसा डाऊनलोड करायचा? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने आता उमंग ऐपमधून सातबारा डाऊनलोड करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे.

आता तुम्ही तुमच्या मोबाईलमधून जमिनीचा सातबारा फक्त १ मिनिटांमध्ये डाऊनलोड करु शकणार आहात.आज आपण या लेखामध्ये how to download 7/12 utara online उमंग ऐपमधून सातबारा कसा डाऊनलोड करायचा? या बद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

आजकाल च्या डिजीटल युगामध्ये आपली अनेक कामे घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल ऐप किंवा पोर्टलच्या सहाय्याने करु शकता.केंद्र सरकारने नागरिकांना कुठेही जाण्याची गरज लागू नये याकरिता अनेक सरकारी योजनांचे ऐप तयार केले आहेत.

राज्यातील ग्रामिण भागात या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला सातबारा काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडू नये याकरिता महाराष्ट्र सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना आपल्या मालकीच्या जमिनीचा सातबारा काढण्यासाठी तालूक्याला किंवा जिल्हयाला जाण्याची गरज पडू नये या करिता महाराष्ट्र सरकारने या उमंग ऐप च्या माध्यमातुन सातबारा काढण्याची नविन सुविधा सुरु करण्यात आली आहे.

या ऐपमधून सातबारा कसा डाऊनलोड करायचा (umang app 7/12 land record download maharashtra) याची प्रक्रिया खालीलप्रमाणें आहे.

उमंग ऐपमधून सातबारा कसा डाऊनलोड करायचा? How to Download 7/12 Utara Online from Umang App?

  • सातबारा डाऊनलोड करण्यासाठी सर्व प्रथम आपल्या मोबाईल मधिल प्ले स्टोर (Play Store) ऐप ओपन करा.
  • प्ले स्टोर ऐपच्या सर्च बॉक्स मध्ये उमंग ऐप (Download umang app) असे सर्च करुन आपल्या मोबाईल ऐप install करु घ्या.
  • आपल्या मोबाईलमधून उमंग ऐप ओपन केल्यानंतर आपल्याला काही permission मागितले जातील त्याला Allow करा.
  • ऐप ओपन झाल्यानंतर welcome to umang असे दिसेल त्याखाली आपल्याला दोन पर्योय दिसतील. 1- Login, 2- Register
  • आपण जर या अगोदर हे ऐप वापरले असेल तर ऐपमध्ये आपला मोबाईल नंबर टाकून ओटिपी सह लॉगिन करा.
  • या अगोदर अकाऊंट नसेल तर रजिस्टर (register) वर क्लिक करा.

उमंग ऐपची नोंदणी कशी करावी? how to register umang app?

  1. या अगोदर अकाऊंट नसेल तर रजिस्टर (register) वर क्लिक करा.
  2. नंतर आपण आपला चालू मोबाईल नंबर टाकून एक पिन तयार करून आपण आपले अकाऊंट तयार करु शकता.
  3. पुढे आपण लॉगिन करा आणि पुढिल प्रक्रिया सुरु ठेवा.
  4. लॉगिन केल्यानंतर आपण All Services पर्यायावरती क्लिक करा.
  5. पुढे सर्व services दिसतील यामध्ये आपले सरकार महाराष्ट्र हा पर्याय निवडा.
  6. महाराष्ट्र सरकारच्या भरपूर सेवा आपल्याला पाहण्यास मिळतील.या सेवांमध्ये खाली पर्याय निवडा,Maharashtra Land Record
  7. त्या मध्ये तुम्हाला Download 7/12 Land Record हा पर्याय निवडा.
  8. या उमंग ऐपमधून सातबारा डाऊनलोड करण्यासाठी आपण जसे CSC सेंटरमधून सातबारा काढताना पैसे द्यावे लागतात तसेच या ऐपमधून सातबारा डाऊनलोड करण्यासाठी काही पैसे द्यावे लागतात.
  9. सर्व प्थम आपल्याला वॉलेटमध्ये पैसे add करावे लागतात. त्यासाठी check your wallet balance वर क्लिक करा.
  10. अगोदर आपल्याला सबमिट करायचे आहे,पुन्हा तुमच्या वॉलेट मध्ये शिल्लक बॅलन्स दाखवला जाईल.
  11. जर बॅलन्स 0 असेल तर खालील Add Balance वर क्लिक करुन पैसे add करु शकता.आपल्याला जर एक सातबारा काढायचा असेल तर १५ रुपये द्यावे लागतात.
  12. Add balance वरती क्लिक केल्यानंतर pay now वर क्लिक करा.नंतर आपण upi,phone pay, google pay, च्या माध्यमातुन आपल्या वॉलेटमध्ये पैसे add करु शकता.
  13. पुन्हा Download 7/12 हा पर्याय निवडा.व खालिल सर्व माहिती योग्यरीत्या भरुन घ्या.
  14. सर्व माहिती भरल्यानंतर सबमीट वर क्लिक करा.आणि पुढे आपल्या जमिनीचा सातबारा ओपन होईल.
  15. सबमिट वर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करुन पुढे Allow पर्याय निवडा.
  16. सातबारा डाऊनलोड करण्यासाठी मोबाईलच्या उजव्या बाजूला तिन टिंब (three dot) वर क्लिक केल्यानंतर पुढे डाऊनलोड पर्योय निवडा आणि आपला सातबारा डाऊनलोड होण्यास सुरु होईल.

अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल च्या उमंग ऐप मधून आपल्या जमिनीचा फक्त १ मिनिटांमध्ये सातबारा डाऊनलोड करु शकता.

Conclusion
मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही उमंग ऐपमधून सातबारा कसा डाऊनलोड करायचा? (How to Download 7/12 Utara Online from Umang App?)बद्दल संपुर्ण माहिती दिली आहे.जसे की उमंग ऐप मधून सातबारा कसा डाऊनलोड करावा,उमंग ऐपची नोंदणी कशी करावी,आपल्या वॉलेटमध्ये पैसे कसे add करावे,आणि सातबारा डाऊनलोड कसा करायचा इ.मला आशा आहे की,ही पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही ही पोस्ट इतर मित्रांसोबत नक्की शेअर कराल…धन्यवाद.!

FAQ –
१) उमंग ऐपमधून सातबारा कसा डाऊनलोड करायचा? How to Download 7/12 Utara Online from Umang App?

आपल्या मोबाईल मध्ये उमंग ऐप डाऊनलोड करा,लॉगिन करून all services मधून maharashtra land record मधून आपला सातबारा डाऊनलोड करता येतो.

२) उमंग ऐपमधून सातबारा कसा डाऊनलोड करण्यासाठी किती पैसे लागतात?

उमंग ऐपमधून आपला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी प्रति सातबारा १५/- रुपये दर आकारला जातो.

३) उमंग ऐपमध्ये नोंदणी कशी करावी? how to register umang app?

आपले जर या अगोदर अकाऊंट नसेल तर रजिस्टर (register) वर क्लिक करा.
नंतर आपण आपला चालू मोबाईल नंबर टाकून एक पिन तयार करून आपण आपले अकाऊंट तयार करु शकता.
Share this:

Ladki Bahini Yojana Online Link Apply Join Now

Leave a Comment