Maharashtra Ladli Bahin Yojana Online Apply: महाराष्ट्र राज्याच्या 2024 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाकडून खूप मोठी घोषणा करण्यात आली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात येत आहे अशी घोषणा विधानसभेत केली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांना काही कागदपत्राचे पूर्तता करणे आवश्यक आहे विशेष म्हणजे यासाठी योजनेत काही बदल करण्यात आलेले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असा करा अर्ज
लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना अर्ज करावा लागणार आहे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. हा अर्ज अगदी सोप्या पद्धतीने भरायचा आहे, यासाठी सर्वात अगोदर आपले संपूर्ण नाव लिहा लागणार आहे, जर लग्न झाले असेल तर लग्नाच्या अगोदरचे संपूर्ण नाव लिहावे लागेल पुढे जन्मतारीख आणि संपूर्ण पत्ता लिहिणे आवश्यक आहे|
जन्माचे ठिकाण आणि पिनकोड देखील लिहिणे आवश्यक आहे, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर लिहिणे आवश्यक आहे. या अर्जात आपल्याला जे पण प्रश्न विचारण्यात आले आहे इतरही कोणत्या शासकीय व्यक्तीचा लाभ घेतला आहे की नाही असे तिथे नमूद करावे अर्जामध्ये आपले वैवाहिक स्थिती महिलांना द्यावी लागेल.
त्याचप्रमाणे अर्जदार महिलांना आपल्या सर्व बँकेचे सर्व माहिती द्यावी लागणार बँक अकाउंट आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे, यासोबत आपण जो अर्ज भरला त्यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, सेतु केंद्र यांच्याकडून तपासणी घेऊ शकता.
लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला
- इन्कम सर्टिफिकेट/ राशन कार्ड
- अर्जदार महिलांचे हमीपत्र
- बँक पासबुक
- अर्जदारचा फोटो
लाडकी बहीण योजनेच्या भरलेल्या अर्ज कुठे जमा करायचा
अर्जदारांनी संपूर्ण अर्ज ऑफलाईन भरला असेल तर तो अर्ज आपण अंगणवाडी केंद्रावर सेतू केंद्रावर किंवा अधिकृत सरकारी केंद्रावर जमा करू शकता त्याचप्रमाणे आपण ऑनलाईन अर्जदारी शक्ती दूत यावर पण भरु शकता.