या मुलांना मिळणार मोफत गणवेश,बूट,सॉक्स, | मोफत गणवेश योजना 2024

या मुलांना मिळणार मोफत गणवेश,बूट,सॉक्स, | मोफत गणवेश योजना 2024

Mofat ganvesh yojana maharashtra 2024: आता तुमच्या मुलांना मोफत कपडे, बूट, सॉक्स, या वस्तू अगदी मोफत दिल्या जाणार आहेत. मोफत गणवेश योजना ही राज्य सरकार कडून आता ही सुरु करण्यात आली आहे.या योजनेचा Gr देखील निर्गमीत करण्यात आला आहे.तर कशी राबवली जाणार ही योजना? कोणत्या विद्यार्थ्याना मोफत मिळणार गणवेश? अटी व शर्ती काय आहेत? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.


मोफत गणवेश योजना महाराष्ट्र 2024

राज्यामधील सर्व विद्यार्थ्याना मोफत गणवेश योजनेचा लाभ तसेच बूट व सॉक्स देण्याबाबत 6 जुलै 2023 रोजी शासनाकडून जीआर निर्गमीत करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या सम्रग शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत मोफत गणवेश योजनेमधून शासकिय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता 1 ली ते 8 वी च्या सर्व मुली,अनुसुचीत जाती, व जमातीचे सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ दिला जातो.सद्यस्थितीत ऊपरोक्त शाळांमधील फक्त दारिद्रय़ रेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळत नाही.

सदर विद्यार्थ्याना देखील आता मोफत गणवेश योजनाचा लाभ देण्याचा तसेच,मोफत गणवेश योजनेअंतर्गत सर्व पात्र विद्यार्थ्याना एक जोडी बूट,व दोन जोडी पायमोजे,याचा लाभ विद्यार्थांना देण्याबाबतचा हा शासननिर्णय निर्गमीत करण्यात आला आहे.

या मुलांना मिळणार मोफत गणवेश

राज्यातील शासकिय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळां मध्ये इ.1 ली ते 8 वी च्या वर्गातील सर्व मुली,अनुसुचीत जाती, व जमातींची सर्व मुले आणि दारिद्रय रेषेखालील पालकांची सर्व मुले यांच्याबरोबरच योजेपासून वंचित राहणाऱ्या इतर प्रवर्गातील दारिद्रय रेषेवरील पालकांच्या मुलाकरिता दरवर्षी दोन मोफत गणवेश उपलब्ध करुन देण्याकरिता मान्यता देखील देण्यात आली आहे.

या मुलांना मिळणार मोफत बूट व सॉक्स

राज्यामधील मोफत गणवेश योजने प्रमांणेच शासकिय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळां मध्ये इ.1 ली ते 8 वी च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्याना दरवर्षी एक जोडी बूट,व दोन जोडी पायमोजे,याचा लाभ शालेय व्यवस्थापन समिती मार्फत विद्यार्थ्याना देण्याकरिता मान्यता देखील देण्यात आली आहे.

या वर्षापासुन चालु होणार मोफत गणवेश योजना

मोफत गणवेश आणि एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे या योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ पासून करावयाची असल्याने याबाबीची तातडी लक्षात घेऊन मोफत गणवेश योजनेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध करुन देण्याकरीता प्रति विद्यार्थी रु.६००/- याप्रमाणे सन २०२३ २४ या आर्थिक वर्षाकरीता एकूण रु.७५.६० कोटी तसेच, सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे उपलब्ध करुन देण्याकरीता प्रति विद्यार्थी रु. १७०/- याप्रमाणे एकूण रु.८२.९२ कोटी इतका निधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्वसाधारण राज्य हिस्स्याच्या रक्कमेमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


सदर योजना ही राज्य योजना असल्याने पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन लेखाशिर्षास मान्यता देवून त्यातंर्गत या योजने वरील खर्च भागविण्यास तसेच, प्रत्येक वर्षी लाभार्थी विद्यार्थी संख्येनुसार निधी अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

mofat ganvesh yojana maharashtra 2024 या बद्दलची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे दिली आहे. आशा आहे की तुम्हाला ही सर्व माहिती चांगली समजली असेल. तुम्हाला अशीच आणखी महत्त्वाची माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला ती या वेबसाइट वर वाचायला मिळेल.हा लेख आपण पाहिल्यानंतर, तो इतरांना देखील शेअर नक्की करा.

Ladki Bahini Yojana Online Link Apply Join Now
Admin  के बारे में
For Feedback - aakashg1505@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon