सातारा महामार्गासाठी नवा आराखडा : नाशिक फाटा ते खेड, पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग – नितीन गडकरी

पुणे – सातारा या महामार्गासाठी पाच हजार कोटींचा विस्तृत आराखडा तयार केला जात असून संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील दिवे घाट-हडपसर या मार्गाचं चौपदरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली.

gadkri

पुणे : ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (एनएचएआय) चालू वर्षाअखेरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात दीड लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची सुरुवात केली जाणार आहे. याशिवाय अनेक वर्ष रखडलेल्या पुणे-सातारा महामार्गाची निविदा रद्द केली जाईल. पुणे-सातारा महामार्गासाठी पाच हजार कोटी रुपयांचा नवीन विस्तृत आराखडा तयार करून काम पूर्ण केले जाईल,’अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली.

दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण

‘एनएचएआय’तर्फे संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण; तसेच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी कर्वेनगर येथे झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे व प्रा डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार व अन्य नेते, ‘एनएचएआय’चे मुख्य महाव्यवस्थापक अंशुमणी श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

road

एनएचएआयमार्फत नाशिक फाटा ते खेड, हडपसर ते यवत, कात्रज बोगदा ते रावेत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे ते शिरूर, पुणे ते छत्रपती संभाजीनगर अशी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मुंबई-बेंगळुरू हा प्रस्तावित द्रुतगती महामार्ग पुण्याच्या रिंग रोडला जोडला जाईल,’ असे गडकरी म्हणाले. ‘पांडुरंगाच्या कृपेनेच मला बारा हजार कोटी रुपयांच्या पालखी महामार्गाचे काम करायला मिळाले. हा मार्ग हरित मार्ग असावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’असेही त्यांनी सांगितले.

Ladki Bahini Yojana Online Link Apply Join Now
Admin  के बारे में
For Feedback - aakashg1505@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon