Maharashtra Assembly Election 2024
Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघ्ये काही दिवस शिल्लक असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘आम्ही हे करू’ या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मला ब्लू प्रिंटवरून हिणवले गेले होते. २००६ मध्ये महाराष्ट्राची ब्लू प्रिंट आणेन म्हटले आणि २०१४ ला आणली, पण गेल्या १० वर्षात त्याबद्दल कुणीच विचारले नाही, त्याच ब्लू प्रिंटमधले मुद्दे यात आहेत, असे राज ठाकरेंनी सांगितले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काय करणार आणि कसं करणार हे सांगितले आहे. जाहीरनाम्यात मुलभूत गरजा आणि पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. राज ठाकरेंनी चार भागात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
मनसेचा जाहीरनामा
१) मुलभूत गरजा, दर्जेदार जीवनमान, पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, कायदा, सुव्यवस्था, महिला सुरक्षा, क्रिडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार .
२) दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, महाराष्ट्राभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस:रण, मोकळ्या जागा, पर्यावरण आणि जैवविवधता.
३) राज्याचं औद्योगिक धोरण, व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण.
४) मराठी अस्मिता, मराठी भाषेचा प्रचार, दैनंदिन वापरात मराठी, व्यवहारात मराठी, डिजिटल जगात मराठी जागतिक व्यावसीफाटवर मराठी, गड किल्ले संवर्धन, पारंपरिक खेळ.
मतदान करताना विचार करा, राज ठाकरेंचे आवाहन
लोकसभा निवडणुकीत एक खासदार अवघ्या एका मताने निवडून आला होता. पहिल्यांदाच असे घडले. त्यानंतर रिकाऊंटिंगमध्ये ३९ मतांनी विजयी झाला. मला वाटते लोकांनी विसरू नये. तुम्ही उन्हातान्हात जाऊन मतदान केले. ते मत सध्या कुठे आहे? जो पक्ष तु्म्हाला आवडत नाही, त्याला तु्म्ही मतदान करत नाहीत. पण तुम्ही निवडणून दिलेला उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला तर, तुमच्या मताला काय किंमत राहिली? त्यामुळे २० तारखेला विचार करून मतदान करा’, असे आवाहन राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून केले आहे.