The cast of ‘Kantara Chapter 1’ met with a terrible accident, the bus returning after finishing the shoot overturned
कर्नाटकात ‘कंतारा चॅप्टर 1’ या पॅन इंडिया चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. शूटिंग संपवून परतणाऱ्या कलाकारांची बस अचानक उलटली. चित्रपटातील कलाकार एका मोठ्या अपघाताचे बळी ठरले आहेत.
पॅन इंडिया चित्रपट ‘कंतारा चॅप्टर 1’चे शूटिंग कर्नाटकमध्ये सुरू आहे, परंतु आज या चित्रपटाशी संबंधित एक दुःखद बातमी समोर आली आहे. चित्रपटातील अनेक कलाकार अपघाताचे बळी ठरले आहेत. शूटिंग संपवून सेटवरून परतणाऱ्या कलाकारांची बस पलटी झाल्याचं सांगण्यात येत आहे.या अपघातात अनेक ज्युनियर कलाकारांना गंभीर दुखापत झाली आहे. उडुपी जिल्ह्यात बस उलटून ‘कंतारा’ चित्रपटाचे सहा ज्युनियर कलाकार जखमी झाले आहेत. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Kantara Chapter 1 पोलिसांनी माहिती दिली:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री चित्रपटाच्या टीमला घेऊन जाणारी मिनी बस जडकलजवळ उलटली. “जडकलमधील मुदूर येथे शूटिंग पूर्ण करून ते कोल्लूरला परतत असताना ही घटना घडली,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मिनी बसमध्ये 20 ज्युनियर आर्टिस्ट होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर जखमींना जडकल आणि कुंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. कोल्लूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. या अभिनेत्यांच्या उपचाराची जबाबदारी प्रॉडक्शन हाऊस घेईल अशी अपेक्षा आहे.
Kantara Chapter 1
‘कंतारा’ 2022 साली रिलीज झाला होता. लोकांना हा चित्रपट खूप आवडला.
Kantara’ was released in the year 2022. People liked this movie very much.
सिनेमॅटोग्राफी, उत्तम दिग्दर्शन आणि कथानक यामुळे लोकांचे खूप मनोरंजन झाले. हा चित्रपट ऋषभ शेट्टीने दिग्दर्शित केला होता आणि तो चित्रपटाचा मुख्य नायक देखील होता. त्याची निर्मिती होंबळे फिल्म्सने केली होती. या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.
बॉक्स ऑफिस collection:
16 कोटींच्या माफक बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 207 कोटींची कमाई केली. 2 तास 30 मिनिटांचा हा चित्रपट पौराणिक लोककथेवर आधारित होता.
कधी होणार चित्रपट प्रदर्शित Kantara Chapter 1:
आता त्याचा प्रीक्वलही येत आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या घोषणेपासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ‘कंटारा: चॅप्टर 1’ 2 ऑक्टोबर 2025 रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीही मुख्य भूमिकेत आहे.
Kantara Chapter 1या भाषांमध्ये होणार रिलीज
होंबळे फिल्म्सच्या बॅनरखाली विजय किरगांदुर निर्मित, कांतारा २ हा सिनेमा कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. प्रोमो व्हिडिओ शेअर करताना प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियावर, अतीत की गूंज में कदम रखें.’ असे लिहित सस्पेन्स वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.