Pm Kisan Yojana New Registration 2024 – आता शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार अशी करा नविन नाव नोंदणी

Pm Kisan Yojana New Registration 2024

नमस्कार मित्रांनो आज या लेखामध्ये आपण केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता सुरु केलेली योजना म्हणजे Pm Kisan Yojana या योजनेमधून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये दिले जातात.पीएम किसान योजना म्हणजे काय? याच योजनेमध्ये नविन नाव नोंदणी कशी करायची? Pm Kisan Yojana New Registration 2023 योजनेमध्ये कोण पात्र? कोणाला मिळणार योजनेचा लाभ? Pm kisan yojana Beneficiary नविन नाव नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

PM Kisan Yojana New Registration Documents 2024 या बद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.जर तुम्हाला ही या योजनेचा लाभ घेयचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्वपुर्ण आहे.तरी सर्व माहिती शेवटपर्यंत पहा.

What is Pm Kisan Yojana?(पीएम किसान योजना म्हणजे काय?)

देशातील अत्यल्प व अल्प जमिन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेली योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhanmantri kisan sanman nidhi yojana) ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये ०१/१२/२०१८ पासून राबविण्यास सुरुवात झाली.

देशातील शेतकऱ्यांना या योजनेमधून शेतकऱ्यांना वार्षिक ६००० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.योजनेमधून दर ४ महिन्याला देशातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये २००० रुपये जमा केले जातात.या योजनेमध्ये २ हेक्टरपर्यंत जमिन असणाऱ्या कुटूंबाला प्रति हफ्ता २ हजार रुपये म्हणजेच वार्षिक ६ हजार रुपयांचे मानधन दिले जाते.

Pm Kisan Yojana New Registration 2024 (पीएम किसान नविन नाव नोंदणी 2024)

  • मित्रांनो पीएम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला www.pmkisan.gov.in या वेबसाईट वरती क्लिक करा.
  • त्यानंतर थोडे खाली येऊन तुम्हाला फार्मर कॉर्नर (farmer corner) इथे न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन ऑप्शन असेल तर न्यू फॉर्म रजिस्ट्रेशन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला दिसणार आहे येथे तुम्हाला आता दोन ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन रुलर फॉर्मर (Rural Farmer) रजिस्ट्रेशन दुसरा ऑप्शन अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन (Arban Farmer)
  • जर शेतकरी ग्रामीण भागातील असेल तरी ते रुलर फॉर्मर रजिस्ट्रेशन ऑप्शन सिलेक्ट करा. जर शेतकरी शहरी भागातला असेल तर अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन ऑप्शन सिलेक्ट करा.
  • पुढे शेतकऱ्यांचा इथे योग्य आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा इथे मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे.पुढे आपले राज्य तुम्हाला खाली सिलेक्ट करायचं आहे.
  • पुढिल बॉक्स मधील कॅप्चा कोड जसा आहे तो बघून टाकून सबमिट करा. जो तुम्ही वरती मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवरती एक ओटिपी येईल.
  • तर त्यानंतर खाली तुम्हाला आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्या वरती अजून एक ओटीपी आला असेल जो की सहा डिजिट असणार आहे तो तुम्हाला तिथे टाकून व्हेरिफाय आधार ओटीपी वरती क्लिक करा.
  • आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर लवकरात लवकर शेजारील आधार सेंटरवर जाऊन मोबाईल नंबर लिंक करू शकता.आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी आलेला आहे तो टाकून घ्या आणि सबमिट करा.
  • नंतर पुढे आलेला हा फॉर्म ओपन झालेल्या त्यानंतर सर्वात अगोदर तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट (जिल्हा निवडा) सिलेक्ट करा.
  • ज्या ठिकाणी तुमची शेती आहे,त्या शेतकऱ्यांचा सातबारा, जिथे शेती आहे त्या ठिकाणचा डिस्ट्रिक्ट, त्या ठिकाणचा सब डिस्ट्रिक्ट, त्या ठिकाणचा तालुका असेल ब्लॉक असेल आणि त्या ठिकाणच्या गावच्या जमिनीचा जो सातबारा आहे, शेतकऱ्याचा त्या ठिकाणीचेच गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करुन घ्यायचे आहे.
  • जिल्हा, तालुका, गावाचे, नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली (फार्मर्स नेम) शेतकऱ्याचे नाव ऑटोमॅटिकली आलेले दिसेल.त्यानंतर जेंडर (Gender) सुद्धा ऑटोमॅटिकली सिलेक्ट होईल.
  • तुम्ही ज्या कॅटेगिरी मध्ये तुम्ही येत असाल तर ते निवडायचे आहे.
  • त्यानंतर फार्मर टाईप तुम्हाला विचारले जाईल, स्मार्ट किंवा स्मॉल किंवा आदर (other) व स्मॉल मध्ये 1 ते 2 हेक्टर पर्यंत तुमची जमीन, तुमची शेती असेल तर तुम्ही एक ते दोन हेक्टर पर्यंत स्मॉल मध्ये निवडू शकता.
  • जर एक ते दोन हेक्टर पेक्षा जास्त जमिन असेल तर खालचा ऑप्शन other तो सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता.
  • आयडेंटी टाईप आधार कार्ड लागणार आहे बाकीची डीटेल्स आहे तशी इथे आलेली असेल. ऑटोमॅटिक आधार कार्डच्या माध्यमातून ही सर्व माहिती आली आहे.
  • तुम्हाला खाली वडिलांचे नाव, किंवा आईचे नाव, किंवा पतीचे नाव, टाकून घ्या.
  • त्यानंतर लँड रेजिस्ट्रेशन आयडी (Land Registration Id) टाकायचा आहे. लँड रजिस्ट्रेशन आयडी म्हणजे त्याला आपण आता नवीन यु एल पीन (UL PIN) म्हणतो जो की आपल्या सातबारा वरती नविन आलेला आहे.
  • त्यानंतर खाली तुम्हाला रेशन कार्ड नंबर हा तुम्हाला टाकायचा आहे. बारा अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे.त्यानंतर आपली जन्मतारीख ऑटोमॅटिक येईल.
  • पुढे या योजनेतून तुमचे वय जर 60 असेल तर तुम्हाला या योजनेमधून पेंशन मिळते जर हवी असेल तर तुमच्या बँक खात्या मधून काही पैसे चार्ज केले जातील.हवे असेल तर yes करा नसेल तर No करा.
  • पुढे तुमची जर जमिन तुमच्या नावावरती असेल तर single हा पर्याय निवडा.आणि तुमची जमिन जर सामायिक असेल तर joint हा पर्याय निवडा.
  • नंतर पुढे खाली आपल्याला Add हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.पुढे तुमच्या जमिनीची सर्व माहिती भरुन घ्या. आपली जमिन जर 01/02/2019 च्या अगोदरची असेल तर Before हा पर्याय निवडा.नसेल तर After हा पर्याय निवडा.

महत्वाची सुचना –

पीएम किसान च्या नोंदणी करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे तर तुम्ही नोंदणी करत असताना झालेल्या चुकांमुळे तुमची नोंद मंजूर होत नाही किंवा तुम्ही अपात्र होता.
या मध्ये 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा जर तुमचा फेरफार असेल त्याच्या मध्ये जमिनीचे खरेदी असेल किंवा इतर प्रकरणांमधून किंवा इतर फेरफार मधून तुमच्या कडे जमीन आलेली किंवा तुम्ही खरेदी केली‌ असेल तर तुम्ही या योजनेच्या नवीन नोंदणीसाठी पात्र आहात.
तुम्ही अशा प्रकारे नोंदणी केली तर तुमची नोंदणी पात्र होते.परंतु 1 फेब्रुवारी 2019 नंतर जर तुमचा फेरफार असेल तर तो फेरफार फक्त तुमचा जन्म मृत्यू असेल तर जमीन धारकाचा मृत्यू झालेला असेल आणि त्याच्यानंतर वारस नोंदी ने जर पुढच्या वारसाकडे जमीन गेलेली असेल तर असेच वारस या योजनेकरिता पात्र होतात.
त्याच्यामुळे नोंदणी करताना 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा फेरफार तो कशा प्रकारचा आहे,आणि एक फेब्रुवारी 2019 नंतर चा फेरफार तो कशा प्रकारचा आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे.
याच्या नंतर आपल्याला कॅलेंडर मधून आपली जी फेरफाराची तारीख आहे ती तारीख याच्यामध्ये घ्यायची आहे.तर अशा प्रकारच्या अटी शर्ती याच्यामध्ये ना आहेत.
पुढे वरील तुमच्या जमिनीची सर्व माहिती भरुन Add वरती क्लिक करा.Add वरती क्लिक केल्याबरोबर आपण भरलेली सर्व माहिती आपल्याला दाखवली जाईल.
खाली Add Documents वरती क्लिक करुन महत्वाचे कागदपत्रे अपलोड करुन घ्या.पुढे सबमिट केल्यानंतर आपले जे पीएम किसान साठी चे रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे.
पुढे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपला आधार नंबर हाच आपला रजिस्ट्रेशन नंबर म्हणून दाखवला जाईल.तुमची पीएम किसान योजनेसाठी ची नोंदणी success झालेली आहे.तुमचा आधार नंबर हाच तुमचा फार्मर आयडी (farmer id) असणार आहे.

Pm Kisan Yojana New Registration Status Check (पीएम किसान योजना नवीन नोंदणी स्थिती तपासणे)

वरील सर्व माहिती सबमिट केल्यानंतर झालेल्या नोंदणीची स्थिती कशी तपासायची? ही झालेली नोंदणी मंजूर झाली आहे का? हे सुद्धा आपण याच पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतो. ते आपण खालिलप्रमाणे पाहणार आहोत.

  • पीएम किसानच्या पोर्टलवरती self किंवा CSC Registration Status पर्याय निवडा.
  • यामध्ये सर्वप्रथम आपला 12 अंकी आधार नंबर टाकून घ्या ज्या नुसार आपण नोंदणी केलेली आहे.
  • पुढिल बॉक्स मधिल कॅप्चा कोड (Captcha Code) जसा आहे तो बघून टाका आणि पुढे Search पर्यायावरती क्लिक करा.आणि पुढे आपल्या नोंदणीची स्थिती दाखवली जाईल.

Conclusion
मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही पीएम किसान नविन नोंदणी – Pm Kisan Yojana New Registration 2023 बद्दल संपुर्ण माहिती दिली आहे.जसे की पीएम किसान योजना म्हणजे काय, पीएम किसान योजनेसाठी नविन नोंदणी कशी करायची,नविन नोंदणी झालेली स्थिती कशी तपासायची, इ. संपुर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे,मला आशा आहे की,ही पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही ही पोस्ट इतर मित्रांसोबत नक्की शेअर कराल…धन्यवाद.!

“Pm Kisan Yojana” FAQ

१. पीएम किसान योजना म्हणजे काय?

देशातील अत्यल्प व अल्प जमिन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेली योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होय.

२. पीएम किसान योजना नविन नोंदणी कशी करायची?

मित्रांनो पीएम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला www.pmkisan.gov.in या वेबसाईट वरती क्लिक करा.
त्यानंतर थोडे खाली येऊन तुम्हाला फार्मर कॉर्नर (farmer corner) इथे न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन ऑप्शन असेल तर न्यू फॉर्म रजिस्ट्रेशन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे संपुर्ण माहिती या लेखामध्ये पाहू शकता.
३.पीएम किसान योजना नविन नोंदणी स्थिती कशी तपासायची?

पीएम किसानच्या पोर्टलवरती self किंवा CSC Registration Status पर्याय निवडा.
यामध्ये सर्वप्रथम आपला 12 अंकी आधार नंबर टाकून घ्या ज्या नुसार आपण नोंदणी केलेली आहे.
पुढिल बॉक्स मधिल कॅप्चा कोड (Captcha Code) जसा आहे तो बघून टाका आणि पुढे Search पर्यायावरती क्लिक करा.आणि पुढे आपल्या नोंदणीची स्थिती दाखवली जाईल.
४. पीएम किसान योजना 15 हप्ता 2023 कधी येईल तारीख?

पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येईल? पीएम किसान योजनेच्या अधिकृत ट्विटर हँडलनुसार,सरकार नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2023 रोजी पीएम किसानचा 15 वा हप्ता वितरीत केला जाऊ शकतो.

Ladki Bahini Yojana Online Link Apply Join Now
Admin  के बारे में
For Feedback - aakashg1505@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon